Skip to main content

भारिप -बहुजन महासंघाचे नेते विजय उर्फ मामा लव्हाळे यांचे निधन

अकोला : भारिप -बहुजन महासंघाचे नेते आणि व्याळा-गायगाव मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य विजय उर्फ मामा लव्हाळे यांचे आज पहाटे कर्करोगाशी झुजताना निधन झाले.

लव्हाळे मामा गेली दोन वर्षे पोटाच्या कर्करोगाने आजारी होते, मंगळवारी पहाटे ४ वाजता येथील संत तुकाराम हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी असा आप्तपरिवार आहे, लव्हाळे दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आले होते. त्यांच्यावर खंडाळा ता.बाळापूर येथील स्मशान भूमीवर मंगळवारी दुपारी अंतीम संस्कार करण्यात आले.
यावेळी विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments