Skip to main content
कोण आहे प्रविण संदीप गोसावी?

केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांना 8 डिसेंबर 2018  रोजी एका कार्यक्रमात मारहाण करणारा युवक प्रविण संदीप गोसावी हा आरपीआयचा युवक आघाडीचा कार्यकर्ता होता... त्याने आरपीआय सोडली होती.
     प्रविणचा जन्म 26  सप्टेंबर 1989 रोजी झाला... मुळ गाव इजा तालुका. कारंजा जिल्हा. वाशीम  (विदर्भ) येथील आहे. सध्या अंबरनाथ पुर्व जिल्हा ठाणे येथे राहतो. त्याचा गोसावी कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे. त्याचा दि. 1 जुलै 2018 रोजी विवाह झाला.
    तो एक लेखक आहे. आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ता आहे. अन्यायाविरुद्धात बंड पुकारणारा युवक आहे. फेसबुकवर चळवळ करायची नसते. रस्त्यावर उतरून लढले पाहिजे. अशा विद्रोही जीवनात जगणारा स्वाभिमानी भिमसैनिक प्रविण...

    आपण विचार चिंतक असल्यामुळे भाजपाचा जवळचा पक्ष आरपीआय सोडत आहे म्हणून जाहीर केले..
  प्रविणला इतका रोष आला की त्याने केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवलेला अंबरनाथ येथील कार्यालयात मारहाण केली.  आंबेडकरी चळवळीला आठवले बाधा आहेत म्हणून त्याने हे कृत्य केलं असावं.
   एक स्वाभिमानी भिमसैनिक म्हणून त्याने भुमिका बजावली ती म्हणजे भ्रष्टाचार विरोधी लढणे. अंबरनाथ नगर परिषदेतील लोकसेवकाला भ्रष्टाचार करताना रंगेहाथ पकडुन योग्य ती कारवाई केली होती. ठाम आणि कर्तव्यदक्ष कार्य करणारा भिमसैनिक म्हणून प्रविणची ओळख झाली.

तो त्यांच्या फेसबुकवर एका पोस्ट मध्ये म्हणतो , " रामदास आठवले च्या पक्षात काम करणारी असंख्य माझी मित्र आहेत.... पन मित्रांनो माझा रोष तुमच्यावर नसुन रामदास आठवलेवर आहे.कृपया समजुन घ्या." 
ही पोस्ट दि. 22 एप्रिल 2018 रोजी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यावरून समजते की आठवलेंवर प्रविणचा खुप राग आहे. तसच रामदास आठवले हा आंबेडकरी चळवळीतील लाळचाटु लुच्चा लफंगा बोगस नेता म्हणून फेसबुकवर पोस्ट टाकतो.
     दिल्लीत संविधानाच्या प्रास्ताविका जाळल्या तेव्हा आठवले का बोलले नाहीत.....  भिमाकोरेगाव प्रकरण झालं तेव्हा आठवले का बोलले नाहीत...  बहुतेक याप्रकरणांवर आठवले बोलत का नाहीत म्हणुन आठवलेंवर हल्ला केला असेल. 
    प्रविणच्या बर्‍याच मित्रांनी आरपीआय  (आठवले) पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. 
     सनातन कट्टर हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी तसेच कारवाई करण्यासाठी आपले सरकार या शासकीय वेबसाईटवर मागणी केली होती.  प्रविणला  दि. . 30 आॅक्टोबर 2017 रोजी "समजपत्र" पोलीसांनी पाठवलं होतं. 
संघर्ष करता करता मरण आले तरी चालेल असे म्हणणारा युवक खरचं चुकीचे वर्तन करतोय काय? की रामदास आठवले समाजात चांगले काम करत आहेत. हे तमाम सोशल मीडिया वापरकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे....
(सदरील माहिती ही प्रविण संदीप गोसावी या फेसबुक आयडी वरून घेतली आहे.) 

      -राजकिशोर ससाणे 
             नांदेड

Comments

Popular posts from this blog

भारिप -बहुजन महासंघाचे नेते विजय उर्फ मामा लव्हाळे यांचे निधन

अकोला  : भारिप -बहुजन महासंघाचे नेते आणि व्याळा-गायगाव मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य विजय उर्फ मामा लव्हाळे यांचे आज पहाटे कर्करोगाशी झुजताना निधन झाले. लव्हाळे मामा ...